Saturday, June 18, 2011

नमस्कार

मी काहीतरी नियमित लेखन करावे असे मला माझे अनेक मित्र सुचवीत असत. ही सूचना मोहक वाटणारी होती. अर्थात ही सूचना कितीही मोहक वाटली तरी शेवटी लिहीण्याचं आणि ते ही नियमित लिहीण्याचं अवघड काम करावं लागणार आहे मला… सुचवणा-या मित्रांना नाही ! तेव्हा जॉर्ज  बर्नार्ड शॉ यांचे शब्द उधार घेऊन सांगायाचे तर ही सूचना करणारे सर्व जण माझे मित्र आणि हितचिंतकच आहेत असं म्हणता येणार नाही. त्यामूळे मी ह्या मोहक सूचनेपासून चार हात लांब रहात होतो. पण अखेर नागपूर तरूण भारतने मला जाळ्यात पकडलंच आणि गेल्या 8 मे पासून मी त्यांच्यासाठी नियमित स्तंभलेखन सुरू केलं.

त्यांच्यासाठी लिहायला सुरुवात केल्यानंतर आता ब्लॉग करावा असंही वाटायला लागलं. कारण निदान दर आठवड्याचा एक लेख तरी हातात राहील आणि ब्लॉगवर नियमित काही देता येईल. असा विचार करून हा उपद्व्याप करतोय. सध्या तरी नागपूर तरूण भारतासाठी लिहीलेले लेखच इथे देणार आहे. नंतर वाटलंच तर आणखी स्वतंत्रही काही लिहीन.

गेल्या सात आठवड्यात प्रसिध्द झालेले लेख अगोदर इथे देत आहे. नंतर दर रवीवारी प्रसिध्द झालेला लेख त्याच दिवशी इथे देईन. वाचकांकडून पाठींबा मिळाला तर अधिक लिहू शकतो.

तेव्हा हा अत्याचार चालू द्यायचा की बंद पाडायचा हे ठरवणे आपणा वाचकांच्या हातात आहे.

6 comments:

  1. हो बरोबर है पण सर , या राज्य मध्ये दररोज ही जी राज्य सरकार आहें.ती असे मुर्ख पणा चा काम करते त्या वर लिहून चालणार नाही तर...एक उपयायोजना करणाची गरज आहें...

    ReplyDelete
  2. keep writing n keep inspiring ur kids madhavji...

    ReplyDelete
  3. Sir, Your rational thoughts are always welcome!!!!

    ReplyDelete
  4. माधव अंकल सपोर्ट तो जरुर मिलेंगा ही
    और हम युवाओ को आप लोगो की प्रेरणा की ही जरुरत है
    क्योकि आज का युवा वर्ग न्यूज़, न्यूज़ पेपर मैं ना पढके ऑनलाइन इ पेपर और ब्लोग्स पे ही ज्यादा आकर्षित होता है
    तोह आपसे यही कामना है आप वीकली ना लिखते रेगुलर ब्लोग्स लिखना शुरू कर दीजिये और इवन उससे फेसबुक पर भी अपडेट किया कीजिये यही कामना

    जय माँ भारती

    ReplyDelete
  5. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  6. Sir apla upkram khup chan ahe asch chalu daa sir keep it up sir best wishes

    ReplyDelete